IAS Pooja Khedkar Saam Digital
महाराष्ट्र

Assembly Election 2024: पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात! भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक; मतदारसंघही ठरला

Maharashtra Assembly Election 2024: माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी दिली आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असतानाच वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनीही विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातून ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिलीप खेडकर यांनी सांगितलं की "लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याच वाटत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला व माझ्या कुटूंबीयाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवीत असल्याची माहिती दिलीप खेडकर यांनी दिली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवण्यास इच्छुक असल्याचेही दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही तर इतर पक्षाकडूनही आपल्याला ऑफर आहे, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात आता दिलीप खेडकर हे कोणत्या पक्षाकडून विधानभेच्या रिंगणात उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT