Ahmednagar News
Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: सरबत पिण्यातून विषबाधा; दोन चिमुकल्‍यांचा मृत्‍यू, एकावर उपचार सुरू

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : टाकळी काझी (ता. अहमदनगर) येथील शेतकरी कुटूंबातील तिघा मुलांना घरच्याच खाण्यातून विषबाधा झाल्याची घटना (Ahmednagar) घडली. यात दोन चिमुकल्‍यांचा दुर्देवी मृत्‍यू झाला आहे. तर एकाची प्रकृती देखील चिंताजनक असून त्‍याच्‍यावर उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

अहमदनगर तालुक्यातील टाकळी काझी या गावातील ही दुर्देवी घटना घडली आहे. शेतकरी कुटूंब असलेल्‍या बापू म्‍हस्‍के हे परिवारासोबत वास्‍तव्‍यास आहेत. तिन्ही मुलांनी ७ मार्चला सरबत करून पिल्याचे सांगितले. ज्‍यूस पिल्‍याने मुलांना यतून विषबाधा झाली. ८ मार्चला सकाळी शिवराज म्‍हस्‍के यास उलट्या झाल्याने त्याचा लागलीच मृत्यू (Death) झाला. मुलांना त्रास होवू लागल्‍याने त्‍यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

दोन चिमुकल्‍यांचा मृत्‍यू

शिवराज यास उलट्या झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्वराज व सार्थक यांनाही उलट्या होऊ लागल्याने त्यांना नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्‍यान रात्री ८ च्या दरम्यान स्वराज बाप्पू म्हस्के (वय १४ महिने) याचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर सार्थक भाउसाहेब म्हस्के (वय १४) याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका पोलीस स्टेशनचे भानुदास सोनवणे यांनी पंचनामा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

SCROLL FOR NEXT