Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकसभेला उमेदवार देणारच; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

Ahmednagar News : लोकसभेसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असून उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत. त्यानुसार मराठा समाज देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यानुसार (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज (Lok Sabha) लोकसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार देणार असल्याचा ठराव आज मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.  (Breaking Marathi News)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मागणीबाबत निर्णय न झाल्याने समाजाची राज्य सरकारवर नाराजी आहे. यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागल्याने निर्णय लांबला आहे. दरम्यान लोकसभेसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असून उमेदवारांची नावे निश्चित केली जात आहेत. त्यानुसार मराठा समाज देखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याऐवजी मराठा समाजाचा उमेदवार या निवडणुकीत देण्यात यावा; असा ठराव सर्वांनुमते करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३० मार्चला उमेदवाराची घोषणा 

या बाबतचा अवहाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना देण्यात येणार आहे. अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून या सर्व उमेदवारांचा अंतिम अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ३० मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी बाबत घोषणा होऊ शकते अशी माहिती अहमदनगर येथील मराठा समाज समन्वयकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

SCROLL FOR NEXT