Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: आर्थिक देवाण-घेवाणीतून विद्यार्थ्याची हत्या; दोन महिन्यांनी उलगडा, दोन आरोपी जेरबंद

Ahmednagar News: आर्थिक देवाण-घेवाणीतून विद्यार्थ्याची हत्या; दोन महिन्यांनी उलगडा, दोन आरोपी जेरबंद

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अकोले (Akole) येथील संकेत नवले या विद्यार्थ्याची हत्या झाली होती. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना (Police) दोन महिन्यानंतर यश आले. आर्थिक देवाण-घेवाणीतून दोघांनी त्याचा खून करुन मृतदेह एका नाल्याजवळ आणून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. (Tajya Batmya)

अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील संकेत नवले हा संगमनेरमध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या संकेतचा मृतदेह ८ डिसेंबर २०२२ रोजी संगमनेर शहरातील नाटकी नाल्याच्या परिसरात आढळून आला होता. शवविच्छेदनातून संकेतची हत्या (Crime News) झाल्याचे समोर आले होते. मात्र घटनेनंतर मारेकरी मयत संकेतचा मोबाईलही घेऊन गेल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

दोघांशी झाला होता वाद

घटनेच्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मयत संकेत नवले हा नाटकी नाल्याच्या परिसरात स्वतः गेला होता. तेथे त्याचा आरोपी शाहरुख शेख (वय ३२) आणि सलमान शेख (वय ३०) या दोघांशी आर्थिक देवाण-घेवाणीवरून शाब्दिक वाद झाला. या वादातून दोघांनी संकेतच्या डोक्यात लोखंडी पाईपने घाव घालीत त्याला ठार केले. त्यानंतर मृतदेह दुचाकीवर टाकून काही अंतरावर नेवून तो नाल्याच्या बाजूला फेकून दिला.

अखेर छडा लावत आरोपी ताब्‍यात

पोलिसांच्‍या हाती सबळ पुरावे नसल्याने आरोपींपर्यंत पोहचणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके दिवस रात्र काम करून सर्व बाजूंनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत होते. नवलेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनंतर अकोल्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांचा देखील तपास पथकात समावेश करण्यात आला. अनेक दिवस उलटूनही उलगडा होत नसल्याने प्रकरणाचे गुढ वाढले होते. पोलिसांनी दोन महिने तपास करून अखेर हत्येचा छडा लावत दोघा आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT