Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात २० एकर जागेमध्ये श्रीराम सृष्टीची उभारणी होत आहे. चासनळी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत ही संकल्पना राबवली आहे. शासनाकडून या प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय गावकऱ्यांनीही आतापर्यंत लाखो रुपयांची वर्गणी एकत्र केली आहे. भव्यदिव्य श्रीराम सृष्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प शिर्डी-सुरत मार्गावर गोदावरी नदीजवळ आकार घेत आहे.
चासनळी गावातल्या श्रीराम सृष्टीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मारीच राक्षसाचा वध हे शिल्प साकारण्यात आले आहे. साधुसंताच्या हस्ते या शिल्पांचा लोकापर्ण सोहळा पार पडला आहे. चासनळी गावाचा रामायणाशी संबंध आहे. दंडकारण्यात सुवर्ण मृर्ग म्हणजे मारीच राक्षसाचा वध करताना श्रीराम यांनी दोन बाण मारले. त्याचा नेम चुकल्याने पहिला बाण चास गावात येऊन पडला. बाणाने गावातल्या जमिनीवर नळीसारखा आकार पडल्याने गावाला चासनळी हे नाव पडले, अशी परिसरात अख्यायिका आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सृष्टीमध्ये ४ भव्य प्रदेशद्वार, ४ घाट, भव्य भक्तनिवास, रामायण रिसर्च सेंटर, पीएचडी मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय लेझर शोसाठीही यंत्र बसवले जाणार आहे. श्रीराम सृष्टीची कल्पना ग्रामस्थांच्या मनात आली. त्यांनी वर्गणी गोळा करत प्रकल्पाची सुरुवात केली. पुढे राज्य सरकारनेही या भव्यदिव्य प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे प्रकल्पाला वेग आला आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २१ फूट उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती उभारण्यात आली आहे. श्रीराम यांनी मारीच राक्षसाचा वध केल्याचे शिल्प पूर्ण झाले आहे. शिल्पाच्या लोकापर्णासाठी खासदार स्वामी उमेशनाथजी महाराज, महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरी महाराज उपस्थित राहिले होते. शिर्डीपासून काही किलोमीटरवर असलेले चासनळी हे छोटेसे गाव देशाच्या नकाशावर आल्याने परिसरात पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.