Leopard Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: संगमनेर शहरात बिबट्याचा पाच तास मुक्त संचार; शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहरात लोकवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना आज सकाळी घडली. (Sangamner) सुरुवातीला नाशिक रोडवरील मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतलेल्या बिबट्या (Leopard) नंतर मलादाड रोडवरील आदर्श कॉलनीकडे गेला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (Breaking Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळीच एका बिबट्याने पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून संगमनेर शहरात प्रवेश केला. नाशिक (Nashik) रोडवरील मालपाणी लॉन्सची संरक्षक भिंत ओलांडून बिबट्याने आत प्रवेश केला. मात्र लॉन्सच्या कर्मचाऱ्यांनी गदारोळ केल्याने त्याने त्याठिकाणाहून धूम ठोकली. बिबट्याचा हा मुक्त संचार लॉन्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सकाळच्या वेळी रस्त्यावर वाहतूक आणि नागरीकांची वर्दळ असल्याने गोंधळलेला बिबट्या मालदाडरोडने धावत आदर्श वसाहतीत शिरला आणि तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन लपला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेस्क्यू ऑपरेशन करत पकडले 

भरवस्तीत बिबट्या शिरल्याची चर्चा शहरभर पसरल्याने मालदाड रोड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच (Forest Department) वन विभागासह शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात यश आले. संगमनेर शहरात तब्बल पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या थरारानंतर वनविभागाच्या पिंजऱ्यातून बिबट्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले. सुदैवाने या यात कुठलीही जिवीतहानी झाली नसली तरी शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT