KDMC News : कंत्राटी चालकाकडून आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग; कारण मात्र गुलदस्त्यात

Kalyan Dombivali News : पालिका आयुक्त इंदुरानी जाखड यांचा २१ डिसेंबरला केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करने पालिकेच्या एका कंत्राटी वाहन (Kalyan) चालकाला चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

KDMC News
Organic Papaya Farming: उच्चशिक्षित शेतकऱ्याची सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती; रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारले गोमूत्र

केडीएमसीतील धर्मेंद्र सोनवणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पालिका आयुक्त इंदुरानी जाखड यांचा २१ डिसेंबरला केडीएमसीच्या (KDMC) अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा धर्मेंद्र सोनवणे हा कंत्राई चालक दुचाकीने पाठलाग करत होता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेले आयकार्ड पाहिले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत (Dombivali) सोनवणे यांची चौकशी केली. संबंधित विभागाला सोनवणे याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KDMC News
Beed News : बीड नगरपरिषदेला खुद्द जिल्हा न्यायाधीशाचे पत्र; पत्रातून तक्रार मांडून केली पोलखोल

दरम्यान आयुक्त कोणत्या परिसरात जात आहेत; हे पाहण्यासाठी धर्मेंद्र सोनवणे आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता. याबाबत सोनवणे कुणाला तरी माहिती देत असल्याचे बोलले जात आहे. सोनवणे कुणाला काय माहिती देत होता? हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात राजरोसपणे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले होते. आयुक्त यांच्या दौऱ्याआधीच सगळं सुस्थितीत असल्याचे दाखवून द्यायचे असल्याने आयुक्तांच्या दौऱ्याची माहिती काढण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com