KDMC News: सरकार कर्ज देतं पण जागा नाही, आम्ही जायंच कुठे, केडीएमसीच्या कारवाईविरोधात फेरीवाले आक्रमक

Kalyan Dombivli Hawkers News: फेरीवाला धोरण राबवून आधी आमचे पूनर्वसन करा, अशी मागणी करत फेरीवाल्यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाल्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून इंदिरा चौकात ठिय्या मांडला.
KDMC News
KDMC NewsSaam Digital
Published On

अभिजित देशमुख

KDMC News

एकीकडे शासन स्वनिधी योजनेतून व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपये कर्ज देतेय, कर्ज घेऊन फेरीवाले व्यवसाय करतात मात्र महापालिका कारवाई करतेय. त्यामुळे आम्ही कर्ज कसं फेडायचं असा सवाल फेरीवाल्यांनी केला आहे. फेरीवाला धोरण राबवून आधी आमचे पूनर्वसन करा, अशी मागणी करत फेरीवाल्यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाल्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून इंदिरा चौकात ठिय्या मांडला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 2014 पासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही. फेरीवाल्यांची नोंदणी होऊनही, फेरीवाल्यांना शासनाच्या नियमानुसार कर्ज उपलब्ध करूनही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा नाही. स्टेशन बाहेरील 150 मीटर परिसरात फेरीवाले बसले तर पालिकेडून कारवाई होते, असा आरोप कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KDMC News
Pune News: पुण्यात Vlog करणाऱ्या कोरियन तरुणीचा विनयभंग, फोटा काढताना गळ्यात टाकला हात; नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

तसेच दुसरीकडे नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यासाठी ठरवलेले धोरण फक्त कागदावरच आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी लवकरच टाऊन वेडिंग कमिटी निर्णय घेईल असे अनेक वेळेला आश्वासन देण्यात आले. तसेच राजकीय पुढारी देखील फेरीवाल्यांच्या निर्णयाबाबत केवळ आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. जर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर लवकरच शेकडो महिला-पुरुष फेरीवाले पालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

KDMC News
Santacruz News: सांताक्रुज पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम; वृद्धाश्रमातील वृध्दांना घडवली समुद्र सफर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com