Ahmednagar Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : रुग्णालयाचा लॉगिन वापरून बनविले खोटे दिव्यांग प्रमाणपत्र; चार जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारची तपासणी न करता शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी हे बनावाट प्रमाणपत्र मिळवण्यात आलेत. २० मार्च ते २५ एप्रिल २०२४ दरम्यान हा गुन्हा घडला आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : दिव्यांगांना शासकीय योजन तसेच सवलतींचा लाभ मिळत असतो. यासाठी अनेकजण बनावट प्रमाणपत्र तयार करून लाभ घेत असतात. अशाच प्रकारे अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयातील दोन अज्ञात कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारची तपासणी न करता शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी हे बनावाट प्रमाणपत्र मिळवण्यात आलेत. २० मार्च ते २५ एप्रिल २०२४ दरम्यान हा गुन्हा घडला आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत तोफखाना पोलिसात फिर्याद दिली आहे. सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी याबाबत तक्रार केली होती. दरम्यान या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी महापुरे यांनी केली.

रुग्णालयाचा वापरला लॉगिन 
जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती भरत हे दिव्यांग  प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे. प्रसाद बडे, सुदर्शन बडे, गणेश पाखरे, सागर केकाण अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT