Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar: बबनराव घोलपांच्या प्रतिमेला जोडेमारोनंतर आज दुग्धाभिषेक

बबनराव घोलपांच्या प्रतिमेला जोडेमारोनंतर आज दुग्धाभिषेक

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

अकोले (अहमदनगर) : शिवसेना ठाकरे गटाकडून अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र या निवडीनंतर ठिकठिकाणी ठाकरे गटात संघर्ष निर्माण झाला. अकोले तालुक्यात शिर्डी (Shirdi) लोकसभेचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात एका गटाने तर दुसऱ्या गटाने समर्थनार्थ आंदोलन केले. (Maharashtra News)

अकोले (Akole) तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांना पदावरून हटवल्याने हा संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरेंच्या शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उत्तर नगर (Ahmednagar) जिल्ह्यात पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. मात्र या निवडीनंतर मोठा रोष पहायला मिळत आहे. अकोले तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांना तालुकाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर धुमाळ समर्थकांनी बबनराव घोलप यांच्या पुतळ्यास काल जोडे मारो आंदोलन करत घोलप यांना संपर्कपदावरून हटवण्याची मागणी केली.

फोटोला केला दुग्‍धाभिषेक

आज ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांनी बबनराव घोलप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत समर्थन केले. घोलप हे कट्टर शिवसैनिक असुन शिंदे गटाची सुपारी घेऊन काहीजण बिनबुडाचे आरोप करत असतील, तर ते खपवुन घेणार नाही असे घोलप समर्थंकांनी म्हटले आहे.

निवडणुकीवर असले लक्ष

आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुठे ना कुठे तरी ठाकरे गटाच्या बंडाळीचा फायदा विरोधकांना होईल. असे चित्र पदाधिकारी निवडीवरून समोर येत असुन यावर संपर्क प्रमुख बबनराव घोलप काय मार्ग काढतात का? याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरुवात, पुणेकरांना तात्पुरता दिलासा

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT