Ahmednagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Corporation : अहमदनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची वीज कापली; महावितरणची कारवाई, पाणीपुरवठ्यावर परिणाम

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका वापरात असलेल्या विजेचे बिल भरणा महापालिकेकडून करण्यात आलेला नाही. यामुळे वीजबिलाची थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली. महावितरणने बिल भरण्याबाबत वारंवार पत्र देऊन बिल भरणा केला नाही

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहमदनगर
: महावितरणच्या देय असलेले वीजबिल थकीत असल्याने महावितरणने अहमदनगर (Ahmednagar) महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. वीज खंडित केल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होत असलेला पाणी उपसा गेल्या २४ तासापासून (Mahavitaran) बंद आहे. यामुळे पुढील पंधरा दिवस अहमदनगर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. (Breaking Marathi News)

अहमदनगर महापालिका वापरात असलेल्या विजेचे बिल भरणा महापालिकेकडून करण्यात आलेला नाही. यामुळे वीजबिलाची थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली. महावितरणने (MSEDCL) बिल भरण्याबाबत वारंवार पत्र देऊन बिल भरणा केला नाही तर वीज खंडित केली जाईल असे सूचित केले होते. तरी देखील महापालिकेने बिल भरणा केला नसल्याने अखेर महावितरणने वीज खंडित करण्याची कारवाई केली आहे. मागील २४ तासांपासून वीज नसल्याने पाणी उपसा देखील बंद आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महावितरण कंपनी आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये अद्यापही तोडगा न निघाल्याने सात लाख नागरिक वेठीस धरले जात आहे. तोडगा निघत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांच्या यांच्या दालनात स्वतःला कोंडून घेतले आहे. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा इशारा दिला.  यानंतर बिल भरण्याबाबत तोडगा काढत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

Thusrday Horoscope : विजयादशमी असली तरी आयुष्यात अडचणी येणार; ५ राशींच्या लोकांच्या नशिबात संकटे

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT