H3N2 Virus
H3N2 Virus Saam tv
महाराष्ट्र

H3N2 Virus: २३ वर्षीय विद्यार्थ्याचा H3N2 ने मृत्‍यू; अहमदनगरमध्‍ये प्रशासन सतर्क

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : राज्‍यात H3N2 इन्‍फुलन्‍सचा प्रसार वाढत आहे. यात आज अहमदनगरमध्‍ये 23 वर्षीय विद्यार्थ्याचा या नव्‍या व्‍हायरसमुळे मृत्यु झाला आहे. यामुळे (Ahmednagar) जिल्हा प्रशासन आता सतर्क झाले असून आयसोलेशन वार्ड व आयसीयू सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

राज्‍यात H3N2 व्‍हायसर हळूहळू स्‍प्रेड होवू लागला आहे. अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये H3N2 चे रूग्‍ण आढळून येत आहेत. तर राज्‍यात काही मृत्‍यूची नोंद देखील झाली आहे. दरम्‍यान अहमदनगरमध्ये (MBBS) एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा H3N2 व्‍हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद आज झाली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशासनाच्यावतीने ४० बेडचे वीलगीकरणं कक्ष व १५ बेडचे आयसीयु सेंटर उभारण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे.

संपर्कात आलेल्‍यांचा शोध

H3N2 मुळे २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान H3N2 या नव्‍या व्‍हायरसने अहमदनगर जिल्ह्यात शिरकाव केल्याने जिल्हा रुग्णालयात विलगीकरणं कक्ष व आयसीयू सेंटर उभारण्यात आले असून प्रशासन तयारीला लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT