मोबीन खान
अहमदनगर: शेतकरी (Farmer) आई-वडिल आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कष्ट करत असतात. शेतात दिवसरात्र राबून पैशाची जमवाजमव करुन मुलांच्या शिक्षणासाठी (Education) खर्च करत असतात. त्याच जोरावर शेतकऱ्यांची मुलं यशस्वी होतात. पण आपल्या वडीलांच्या कष्टाचे चीज काहजणच करत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या वडिलांना महागडी चारचाकी गाडी गिफ्ट दिल्याचे समोर आले आहे.
या मुलाने आपल्या आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवशी एमजी ग्लोस्टर कार भेट दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द या गावात राहणारे बाबासाहेब पुंगळ यांनी ही महागडी कार भेट दिली. याची चर्चा सर्व जिल्ह्यात सुरू आहे. (Ahmednagar Latest News)
यमाजी पुंगळ दाम्पत्यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा बाबासाहेब यमाजी पुंगळ याचे दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे झाले व पुढील शिक्षण (Education) घेण्यासाठी पुण्याला जावे लागले. दहावीत चांगले मार्क मिळाल्याने त्यास शिष्यवृत्ती मिळून पुण्यातील इंजीनियरिंग गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक व एमआयटी पुणे येथे मोफत प्रवेश मिळाला.
घरची परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षण(Education) घेण्याकरिता कमवा व शिका या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वीस वर्ष पुण्यात नोकरी केली. तसेच बुद्धीच्या जोरावर पुढील पाच वर्ष साऊथ कोरिया या देशात नोकरी केली. आपल्या गावासह परिसरातील शेतकऱ्यांची मुले ही फक्त शेतीवर (Farmer) अवलंबून न राहता उच्च शिक्षण () घेण्याकरिता बाहेर पडावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी बाबासाहेब यमाजी पुंगळ आणि त्यांच्या पत्नी निर्मला बाबासाहेब पुंगळ या दाम्पत्यांनी स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर एक आधुनिक यंत्राचे स्पेअर पार्ट बनवण्याचा कारखाना उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.(Ahmednagar Latest News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.