अहमदनगरच्या पालकमंत्री पदाची धुरा तनपुरेंच्या खांद्यावर? SaamTvNews
महाराष्ट्र

अहमदनगरच्या पालकमंत्री पदाची धुरा तनपुरेंच्या खांद्यावर?

पालकमंत्री हसन मुश्रीफ आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रश्मी पुराणिक

अहमदनगर : राज्याचे ग्रामविकासमंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे.

हे देखील पहा :

मात्र, असे असतानाही मुश्रीफ यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय समीकरणे हाताळण्यात अडचणी येत असल्याचे खुद्द मुश्रीफ यांनीच अनेकदा पक्षाकडे कळवले आहे. त्या अनुषंगानेच आता नगरचे पालकमंत्रीपद बदलण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

पालकमंत्री पदाचा कारभार स्वीकारतानाच मुश्रीफ यांनी केवळ दोन वर्षांसाठी पालकमंत्रिपद घेणार असल्याचे पक्षाकडे सांगितल्याची माहिती आहे. तसेच मुश्रीफ यांना कोल्हापूरहून दरवेळी अहमदनगरला येणे देखील अडचणीचे ठरत होते. कोल्हापुरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र्रवादीची या निवडणुकांमध्ये मुश्रीफ यांच्यावर मदार असल्याचेही बोलले जात आहे.

कोण असणार नवा पालकमंत्री?

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे येथील पालकमंत्री पदासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, नगरचे पालकमंत्री कोण असणार याबद्दल दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT