राज्यात शेतकरी आत्महत्येत अमरावती जिल्हा अव्वल!

राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यामध्ये २०२१ या वर्षात सर्वाधिक ३५६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
farmers suicide
farmers suicidesaamtv
Published On

अमरावती : निसर्गाचा लहरीपणा, योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतीतून मिळणारा नफा शेतकऱ्यांला मिळत नाहीये. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवतो आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती (Amravati) जिल्ह्यात झाल्या आहेत. २००१ पासून शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दरबारी घेणे सुरू आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यामध्ये २०२१ या वर्षात सर्वाधिक ३५६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

हे देखील पहा :

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) होऊनही याकरीता शासन कटिबद्ध असल्याचे सांगत असलं तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र काही वेगळीच आहे.  दरवर्षी शेतकर्‍यांच्या आत्महत्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण? विदर्भात (Vidarbha) शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढताहेत? असे कित्येक प्रश्न सरकारे बदलली तरीही उत्तरांच्या अपेक्षेत आहेत.

farmers suicide
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताच मध्यप्रदेश सरकारने बंद केल्या सीमा!

सरकारचं (Government) वेळकाढू धोरण आणि केवळ आश्वासन यात शेतकरी डबघाईस आलेला आहे. निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नसल्याने शेतकरी (Farmer) मृत्यूला कवटाळतो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरण तयार करत.

मात्र, ते केवळ कागदावरच राहिल्या सारखं दिसून येत आहे. याचे कारण शेतकऱ्यांच्या दरवर्षी आत्महत्येत (Suicide) वाढ होताना दिसत आहे. नैसर्गिक संकटातून नुकसान होऊ नये, याकरिता शेतकरी विमा काढतो. मात्र, त्याला विमा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. परिणामी शेतकरी आत्महत्येकडे ओढला जातो आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com