Ahmednagar History Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar History: अहमदनगरचा आज स्थापना दिन ! जाणून घ्या नाव आणि शहराचा इतिहास, वाचा सविस्तर

अहमदनगर शहराचा आज 533 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Vishal Gangurde

सुशील थोरात

Ahmednagar History: अहमदनगर शहर म्हणजे कोणताही काना मात्रा नसलेल्या अहमदनगर शहराचा आज 533 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नगरकर मोठ्या उत्साहाने हा स्थापना दिवस साजरा करत आहे. या ऐतिहासिक अहमदनगगर शहराबद्दल जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

निजाम काळातली राजधानी म्हणून अहमदनगर शहराची ओळख आहे. या अहमदनगर शहराची स्थापना अहमद बादशहाने केली असल्याने शहराचे नाव अहमदनगर पडल्याचा इतिहास आहे. अहमद निजाम शहाने या शहराची ई स 28 मे 1490 स्थापना केली होती.

शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही जशाच्या तशा असून अहमद निजाम शहा यांच्या काळात झालेल्या वास्तू या उत्कृष्ट इंजिनिअरिंगचा नमुना म्हणून ओळखला जातो. अहमद निजाम शहाने त्याकाळी खापरी नळ योजना, शहरातील विविध ठिकाणी कारंजे, तलाव इत्यादी वास्तुंची निर्मिती केली होती.

तर राज्यात कुठल्याही शहराचा स्थापना दिवस साजरा होत नाही, त्यामुळे अहमदनगर शहराच्या स्थापना दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे तसेच सर्व धर्मातील धर्मगुरू सामाजिक संघटना आणि इतिहास प्रेमींनी आज अहमद बादशहा यांच्या कबरी वर चादर अर्पण करून अहमदनगर शहरचा स्थापणा दिन उत्साहात साजरा केला. तसेच विविध कार्यक्रमही शहरात राबवण्यात येत आहेत.

संताची भूमी अशीही ओळख

नगरची भूमी संताची भूमी म्हणून देखील ओळखली जाते. या भूमीचा इतिहास रक्तरंजीत देखील आहे. या जिल्ह्यातील योद्ध्यांनी आपले कसब पणाला लावले आहेत. या लढ्यात अनेक जण गतप्राण झाले आहेत. तर अनेक जिंकलेही आहेत. तर संघर्षमय इतिहास असलेल्या या जिल्ह्याला पौराणिक संदर्भही आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

SCROLL FOR NEXT