राज्यातील दोन जिल्ह्यांची नावं बदलून काही महिनेच झाले आहे. आता आणखी एका जिल्ह्याच्या नामांतराची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र लवकरच ही मागणी पूर्ण होण्याचे संकेत माजी मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून व्हावे. याबाबत चौंडी येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे नामांतर होईल अशी आशा आहे, असं भाजपचे आमदार राम शिंदे यांनी यांनी म्हंटलं आहे. याबाबत मी पंधरा दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले असल्याचे राम शिंदे यांनी म्हंटलंय. (Latest Marathi News)
राज्यात अनेक जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. पण अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्याच्या मागील बजेटमध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदनिर्मिती करून त्याचे मुख्यालय शिर्डी करण्यात आले आहे.
त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर येत असताना ते नवीन महसूल प्रशासन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. त्यासाठी 61 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल आहे, असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.