Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: सशस्त्र दरोडा टाकत एकाची निर्घृण हत्या; महिलेला मारहाण करत केले गंभीर जखमी

Shrirampur News: सशस्त्र दरोडा टाकत एकाची निर्घृण हत्या; महिलेला मारहाण करत केले गंभीर जखमी

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपुर (अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा (Crime News) घडल्याची घटना घडली. यात दरोडेखोरांनी एका युवकाची ओढणीच्या (Ahmednagar) सहाय्याने गळा आवळून हत्या केली. तर त्याच्या पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. (Tajya Batmya)

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे- बेलापूर रस्त्यावर हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत नईम पठाण (वय ३३) याची दरोडेखोरांनी हत्या केली आहे. दरम्यान मयताची पत्नी रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. यावेळी दबा धरून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी महिलेला फरफटत घरात आणून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचा आरडाओरडा होताच दरोडेखोर घरात आल्याचे (Police) नईमच्या लक्षात आले. विरोध करणाऱ्या नईमला दरोडेखोरांनी लगेच घरातील झोक्याची ओढणी गळ्याला बांधून त्याची निर्घृणपणे हत्या केली. 

सात लाख रुपये व दागिने लांबविले 

शेती कामासाठी घरात आणलेली मोठी रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. यात त्यांनी सात लाख रुपये आणि सोने- चांदीचे दागिने असा ऐवज लांबवला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दरोड्याचा तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT