Ahmednagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: संतापजनक! चार तरुणांना उलटं टांगून मारहाण; अमानवी कृत्याने अहमदनगर हादरलं

Crime News: अतिशय निर्दयीपणे या तरुणांना झाडाला उलटे लटकवण्यात आले होते.

Ruchika Jadhav

Ahmednagar News:

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरुन ४ तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. सध्या या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शेळी चोरीच्या संशयावरून या तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आलीये. अतिशय निर्दयीपणे या तरुणांना झाडाला उलटे लटकवण्यात आले होते.

नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी काल दिवसभर या चारही तरुणांना झाडाला उलटे लटकवत ठेवले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली. तरुणांसोबत अमानवीय कृत्य झाल्याने श्रीरामपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

मारहाणीत शुभम, कुणाल, ओम आणी अन्य एक तरूण जखमी आहे. तरुणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल केलं आहे. आरोपींना त्वरीत अटक करा अशी मागणी तरुणांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT