Ahmednagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: सुट्टीवर आलेल्या जवानावर १० ते १२ जणांकडून हल्ला; अहमदनगर जिल्ह्यातील भयानक घटना

Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानावर शेतजमिनीच्या वादातून सात ते आठ जणांचा टोळक्याने खूनी हल्ला केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar Crime News: अहमदनगर जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानावर शेतजमिनीच्या वादातून सात ते आठ जणांचा टोळक्याने खूनी हल्ला केलाय. बायजाबाई जेऊर गावातील वाघवाडीत ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत जवानासह त्यांच्या कुटुंबातील ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Breaking Marathi News)

अशोक नामदेव वाघ असं जखमी जवानाचं नाव आहे. अंगाचा थरकाप (Crime News)  उडवणाऱ्या या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अशोक नामदेव वाघ, असं जखमी जवानाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवान अशोक हे नगर तालुक्यातील वाघवाडी गावातील रहिवाशी आहे.

काही कामानिमित्त ते सुट्टीवर गावाकडे आले होते. यावेळी नातेवाईक आणि त्यांच्या शेतजमिनीवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, नातेवाईकांनी शेजारच्यांसह जाधव यांच्या कुटुंबीयांवर लाकडी दांडके, कोयता, कुऱ्हाड अशा तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.

या हल्ल्यात जवान अशोक वाघ यांच्यासह कुटुंबातील आठ जण जखमी झालेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (Police) १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ३ जणांना अटक सुद्धा केली आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या कित्येक दिवसांपासून गुंडांचा हैदोस सुरू आहे. मात्र, पोलीस या गुंडांवर कुठलीही कारवाई करत नसून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा मोठे आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

SCROLL FOR NEXT