Ahmednagar Leopard Attack:  Saamtv
महाराष्ट्र

Leopard Attack News: हृदयद्रावक! अंगणात खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याची झडप; ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Ahmednagar Leopard Attack: भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. २४ मे २०२४

अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरच्या राहुरीमध्ये घडली. वेदिका श्रीकांत ढगे असे या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली. काल वेदिका ढगे ही चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये वेदिका गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचादारम्यानच तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, अमरावती शहरातही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. अमरावती शहरातील कव्हरधाम जवळ बिबट्याने श्वानाची शिकार केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच मध्यरात्री 1 ते दीड वाजता दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. या परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कष्टाला पर्याय नाही, ५ राशींसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Saam Maha Exit Poll: शिर्डी नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? संभाव्य नगराध्यक्ष कोण? पाहा Exit Poll

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

SCROLL FOR NEXT