Ahmednagar Accident News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Accident News : देवदर्शनासाठी निघाले; वाटेतच काळाचा घाला, अपघातात ३ जण ठार १२ जखमी

या भीषण अपघातात 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Accident News : अहमदनगरमध्ये अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. तीन वाहनं एकमेकांसमोर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जण ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Marathi News)

मिळेल्या माहितीनुसार, अहमदनगर शाहरतील पुणे मनमाड बायपास रोडवर आयशर टेम्पो,ट्रक व पिकअपचा भीषण अपघात होऊन पिकअपमधील तिघांचा मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी रात्रिच्या सुमारास घटना घडली. या अपघातात सुमारे आठ ते १० ते १२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाबासाहेब नामदेव जठार , महेश बाबासाहेब खैरनाथ हे दोघे येवला तालुक्यातील असून व आणखी एक (नाव समजू शकले नाही) यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या निंबळक बायपास रोडचे काम सुरू असल्याने एका बाजूनेच वाहतूक सुरू असून दुसरी बाजू वाहतूकीसाठी बंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जाणाऱ्या पिकअपला आयशर टेम्पो व ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला.

पिकअपमधील व्यक्ती देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला असावा अशी माहिती पोलिसांकडून समजली. दरम्यान याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो व ट्रकवरील अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT