Sangamer Accident News Saam TV
महाराष्ट्र

Sangamner News : पेन्शन आंदोलन आटोपून घराकडे निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; शिक्षकासोबत घडली भयंकर घटना

Sangamer Accident News : अंगाचा थरकाप उडवणारी ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Sangamner Accident News : जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी हा संप मागे घेतला. अशातच, पेन्शन आंदोलन आटोपून घरी परतणाऱ्या एका शिक्षकावर काळाने घातला. भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घरी पोहचण्याआधी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

अंगाचा थरकाप उडवणारी ही धक्कादायक घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात पिकअप चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. अजय नन्नवरे (वय 36 वर्ष) असं मृत शिक्षकाचे नाव असून विलास ठोंबरे (वय 23) असं पिकअप चालकाचं नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून पिकअप गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय नन्नवरे हे एका शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होते. आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलनात भाग घेतला होता. आंदोलन संपल्यानंतर ते दुचाकीने (Accident) आपल्या घरी परतत होते. दरम्यान, सायखिंडी फाट्यावरजवळ त्यांची दुचाकी आली असता, समोरून दूध वाहून नेणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, पिकअपने दुभाजक तोडून विरुद्ध बाजूने चाललेल्या शिक्षक नन्नवरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली आणि धडकेनंतर सदर टँकर पलटी झाला. या भीषण अपघातात पिकअप चालकासह शिक्षक अजय नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT