Ahilyanagar Two Groups Battle Saam
महाराष्ट्र

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

Ahilyanagar Two Groups Battle: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल. दोन गटात राडा झाल्याप्रकरणी कारवाई.

Bhagyashree Kamble

  • कोपरगावात किरकोळ कारणावरून २ गटात राडा.

  • पोलिस वाहनांवर दगडफेक.

  • 2 पोलीस जखमी.

सचिन बनसोडे, साम टिव्ही

अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली होती. मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात पोलिस वाहनावर दगडफेकीसह दोन पोलिस जखमी झाले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्विय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे..

नेमकं घडलं काय?

कोपरगाव शहरात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला होता. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. सुरुवातीला जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली.. नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.. या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय..

या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.. आमदार काळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत झालेल्या प्रकारावर चर्चा केली.. 'माझ्या स्वीय सहाय्यक गुन्हा दाखल झाला असला तरी हा वाद गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून झाला असल्याने, या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये', असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय...

दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह मनसेच्या शहरप्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने वरुण, सान्या, रोहितसोबत संस्कारी स्टाईलमध्ये साजरा केली नवरात्री, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बोरिवली पूलाखालील रस्त्यावर अचानक पडला मोठा खड्डा

मोठी बातमी! UPSC मध्ये २१३ पदांसाठी मेगा भरती, कुठे अन् कसा कराल अर्ज?

Pranjal Khewlkar: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना दिलासा, जामीन देण्यामागचं खरं कारण आलं समोर, वकिलांनी नेमकं काय सांगितलं? VIDEO

Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT