Ahilyanagar road Accident update Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar road Accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

Ahilyanagar road Accident update : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत.

Vishal Gangurde

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये भीषण अपघात

५ जणांचा जागीच मृत्यू झालाय, मृतांमध्ये २ लहान मुले

अपघातात वाहनांचे मोठे नुकसान

राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या मेळघाटात ५ मजुरांचा मृत्यू झाला होता. अमरावतीनंतर आता अहिल्यानगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघाता ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या अपघातात श्रीरामपूर येथील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे. भीषण अपघातात श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर रस्त्यावर अनेकांची एकच धावाधाव झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने कारमधून लोकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार करण्यात सांगितले. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळील शासकीय रुग्णालयात पाठवले.

अपघातानंतर रस्त्यावर एकच वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी कार आणि ट्रक बाजूला केला. त्यांनी दोन्ही बाजूचा वाहतूक सुरळीत झाली. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी होती. अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर एकच आक्रोश केला. अपघातात मृत पावलेल्या लोकांचे नावे अद्याप समोर आलेली नाही. परंतु या अपघातात पाच जणांच्या मृत्यूने श्रीरामपूरमधील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरात भटक्या कुत्र्याचा दोन वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला; चिमुकली गंभीर जखमी

Haryana: धक्कादायक! सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत IAS अधिकाऱ्याच्या सचिवाने संपवलं जीवन

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा; कुणाला मिळाली संधी? VIDEO

भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT