Rahuri Rasta Roko Saam tv
महाराष्ट्र

Rahuri Rasta Roko : नगर- मनमाड महामार्ग रोखला; रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक

Ahilyanagar news : महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालवणे देखील जिवघेणे झाले आहे. यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी; अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहुरी (अहिल्यानगर) : नगर- मनमाड महामार्गाची दुरावस्था झाली असल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कारणाने नागरिक आक्रमक झाले असून आज सकाळी नगर- मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  

अहिल्यानगरच्या राहुरी शहरातून जात असलेल्या नगर- मनमाड महामार्गाची बिकट अवस्था झाली आहे. अनेक वर्षापासून महामार्गाची दुरावस्था झाली असून आजतागायत महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. तर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालवणे देखील जिवघेणे झाले आहे. यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी; अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

संतप्त नागरिकांनी अखेर अडवला

महामार्ग महामार्गाची दुरुस्ती होत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे नागरिक रस्त्यावर उतरले आहे. यावेळी रस्ता कृती समीतीच्या वारीने आज सदरच्या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग अडविण्यात आला. बराच वेळ झाले आंदोलन सुरु असल्याने शिर्डी शिंगणापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

अशा आहेत मागण्या

नगर- मनमाड महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे. रोडवर पडलेली खड्डे तात्काळ बुजवण्यात येऊन खड्डे विरहित रस्ता बनविण्यात यावा. रोडवर ज्या ठिकाणी काम सुरू होते, त्या ठिकाणी सूचना फलक दिशा दर्शक फलक लावावेत. तसेच नगर- मनमाड महामार्गाचे काम, वर्क ऑर्डर, साईट गटाराचे आराखडे जनतेसाठी प्रसिद्ध करणे. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

Maharashtra Live News Update: भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला - एकनाथ शिंदे

ZP निवडणुकीआधी मोठी उलटफेर; राष्ट्रवादीमध्ये पुन्हा भाकरी फिरणार, संघटनेत नव्या नियुक्त्या होणार

मोठी बातमी! पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, कारण काय?

SCROLL FOR NEXT