rahuri news  Saam tv
महाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक बिनविरोध नाही; आणखी एका पक्षाचा उमेदवार रिंगणात

vanchit bahujan aghadi news : राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. राहुरी पोटनिवडणूक निवडणूक बिनविरोध होणार नाही. कारण आता या पोटनिवडणुकीत आणखी एका पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे.

Vishal Gangurde

राहुरी पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केलाय

वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वंचितच्या उमेदवारीने स्थानिक समीकरण बदलणार असल्याचा वंचितचा दावा

अहिल्यानगरच्या राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजपने या मतदारसंघातून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष देखील पोटनिवडणुकीत चाचपणी करत आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीची देखील एन्ट्री झाली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार जाहीर केला आहे.

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. वंचितच्या नगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतलाय. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन उमेदवारी घोषित केली आहे.

राहुरीच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर वंचितचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. डॉ. अरुण जाधव म्हणाले, 'आजपर्यंत राहुरी मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिलीये. मात्र, संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीयवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचितने संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे'.

'मतदारसंघातील जनतेने अनिल जाधव यांना विजयी करावी, असं आवाहन डॉ. अरुण जाधव यांनी केलं. वंचितचा उमेदवार रिंगणात उतरल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धारावीत धक्कादायक प्रकार, ८ वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली

Backless Blouse Designs: साडी किंवा लेहेंग्यावर उठून दिसतील हे 5 बॅकलेस ब्लाऊज, नक्की ट्राय करा

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

SCROLL FOR NEXT