Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar : नगर जिल्ह्यातील विखेंच्या कारखान्याची होणार चौकशी; बोगस कर्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Ahilyanagar News : याचिकाकर्ते बाळासाहेब विखे पाटील व दादासाहेब पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन विखे कारखान्याचे संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: तब्बल नऊ कोटी बोगस कर्ज प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका मोठ्या साखर कारखान्याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या बोगस कर्ज प्रकरणी राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. 

कारखाना बोगस कर्ज प्रकरणी याचिकाकर्ते बाळासाहेब विखे पाटील व दादासाहेब पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने कलम १५६ (३) अन्वये तत्कालीन विखे कारखान्याचे संचालक मंडळा विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी आज अहिल्यानगर शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती सांगितले. 

९ कोटी रुपयांचे बोगस कर्ज 

पत्रकार परिषद बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील यांनी संबंधित बोगस कर्ज प्रकरणाची माहिती दिली. यामध्ये विखे कारखान्याचे सुमारे नऊ कोटी रुपयांचे बोगस कर्ज प्रकरण असल्याचे सांगितले. तर या प्रकरणांमध्ये राहता येतील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी कारखाना संचालक मंडळाचे विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देत आदेश रद्द केला होता. 

राहता न्यायालयाचा निर्णय कायम 

त्यानंतर खंडपीठाच्या या आदेशाच्या विरोधात याचिकाकर्ते विखे व पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊन न्यायालयाने राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून संबंधित कारखाना संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Air Filter: बाईकचा एअर फिल्टर किती किलोमीटर्सनंतर बदलावा?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT