Ahilyanagar news Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू तस्करांची मुजोरी सुरूच; महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर प्राणघातक हल्ला

Ahilyanagar news : नदीतील वाळू उपसा करण्यास मनाई आहे. तरी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी केली जाते प्रामुख्याने रात्रीच्या सुमारास नदीतून उपसा करत ट्रॅक्टर व डंपरद्वारे वाळूची वाहतूक जात आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : वाळू चोरी करणाऱ्या तस्करांची मुजोरी वारंवार समोर येत आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांचा हैदोस पुन्हा एकदा समोर आला आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकारी व पोलिसांच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

नदीतील वाळू उपसा करण्यास मनाई आहे. असे असले तरी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी केली जात असते. प्रामुख्याने रात्रीच्या सुमारास नदीतून उपसा करत ट्रॅक्टर व डंपरद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारे होत असलेल्या वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन कारवाई करते. मात्र प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. त्यानुसारच श्रीरामपूर तालुक्यात घटना समोर आली आहे. 

पथकावर करण्यात आली दगडफेक 
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात नदीतून मध्यरात्रीच्या सुमारास वाळूची सुरु असलेली वाहतूक थांबविण्याच्या उद्देशाने कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे तहसीलदार आणि पोलीस उपस्थित असतांना धक्कादायक प्रकार घडला आहे. 

तीन कर्मचारी जखमी 

या कारवाईदरम्यान वाळू तस्करांच्या प्राणघातक हल्ल्यात कोतवाल, तलठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झाले आहे. तर वाळू तस्करांच्या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाले आहे. कारवाई दरम्यान पथकाने एक डंपर पकडला आहे. तर दुसरा डंपर वाळू तस्करांनी पळविला आहे.  

पंढरपुरात अवैध वाळू प्रकरणी २२ गुन्हे दाखल
पंढरपूर
: पंढरपूर येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक केल्या प्रकरणी २५ जानेवारी अखेर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ४७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केली आहे. या कारवाई मधून जवळपास ४७ लाख ७७ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Success: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे बालपण संघर्षमय, पण पुढे आयुष्य बदलून टाकणारी श्रीमंती

Pune Rave Party: मोठी बातमी! पुण्यातील रेव्ह पार्टीत राजकीय कनेक्शन उघड, बड्या महिला नेत्याचा पती पोलिसांच्या ताब्यात

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT