Biodiesel Pump : मलकापूरजवळ अवैध दोन बायोडिझेल पंप सील; मुंबईच्या दक्षता पथकाची कारवाई

Buldhana News : धुळे- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरपासून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल पंप उभारण्यात आले आहेत. अवैधपणे पेट्रोल व डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थांची विक्री केली जात असल्याचे समोर आले
Malkapur News
Malkapur NewsSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैध विक्री केली जात आहे. याठिकाणी मुंबईच्या दक्षता पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. याठिकाणी अवैधरित्या विक्री होणाऱ्या पेट्रोल सदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

धुळे- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरपासून मोठ्या प्रमाणात बायोडिझेल पंप उभारण्यात आले आहेत. याठिकाणी अवैधपणे पेट्रोल व डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थांची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाचा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष असल्याचा आरोप नेहमी होत असतो. याच दरम्यान मुंबईहून आलेल्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Malkapur News
Cyber Police : सायबर गुन्हेगारीतील मुख्य सूत्रधाराशी पाचजण ताब्यात; पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कारवाई

धाड टाकत दोन पंप केले सील  

मुंबई येथील राज्यस्तरीय दक्षता पथक व बुलढाणा पुरवठा विभागाने मलकापूर तालुक्यातील तालसवाडा तसेच रणथम येथे दोन अवैध बायोडिझेल पंपावर धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत दोन्ही पंप सील करण्यात आले आहेत. तसेच १४ जणाविरुद्ध दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बायोडिझेल सदृश्यने भरलेले दोन टँकर देखील जप्त करण्यात आले आहेत.

Malkapur News
Grapes Export : सांगली जिल्ह्यातून यंदा वीस हजार टन द्राक्ष निर्यात; मागील दोन वर्षापेक्षा निर्यातीत वाढ

चार जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान या कारवाईत चार आरोपींना पथकाने अटक देखील करण्यात आली आहे. तसेच ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बायोडिझेल माफियांचे धाबे दणाणले असून डीझेल व पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर यापुढे देखील धडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com