Pathardi Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Pathardi Heavy Rain : पाथर्डीत ढगफुटी; अनेक गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली

Ahilyanagar News : रात्रीपासून पाऊस झाला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव येथील नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरासह जिल्हा सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्री तीनच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला असून पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. विशेषतः शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी झाडांवर आसरा घेतला. जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनेक महामार्गावरील वाहतूक ठप्प 
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती–छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग तसेच पाथर्डी–बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे बराच वेळ या महामार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. तर आता काही ठिकाणची वाहतूक सकाळी हळूहळू सुरू झाली आहे.

मंदिरांना पाण्याचा वेढा, पिके गेली वाहून 
पाथर्डी शहरातही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कसबा विभागातील खोलेश्वर मंदिर, तपनेश्वर मंदिर परिसर पाणी वाढले आहे. आमराई मंदिराला पाण्याचा वेढा बसला आहे. शहर व परिसरात अनेक तास धो-धो पाऊस कोसळत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक शेत जमिनी वाहून गेल्याने पीकही त्याबरोबर नष्ट झाली आहे. अनेक शेत जमिनीत पाणी साचून आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसाने झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी; कोणत्या सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय?

New Year 2026 Trip : हिरवीगार वनराई अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, 'हे' आहे न्यू इयर ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २० दिवस, eKYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार नाहीत? अधिवेशनात काय चर्चा झाली?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Famous Night Club In Goa: गोव्यात नाईटआऊटचा प्लान करताय? या प्रसिद्ध क्लबना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT