Ahilyanagar Rain Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar Rain : अवकाळीने कांद्याची खराबी; गोण्यांमध्ये भरलेला कांदा भिजून एक कोटीचे नुकसान

Ahilyanagar news : फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. मागील तीन- चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस बारसल्याने पिकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान अहिल्यानगरमध्ये शुक्रवारी झालेल्या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा मार्केट मधील कांदा भिजला असून व्यापाऱ्यांचे साधारण एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. मागील तीन- चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. यातच राज्यातील काही भागात पाऊस पडल्याने पिकांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. 

दरम्यान नगर शहरातील कांदा मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस पडेल असा अंदाज व्यापाऱ्यांना आला नाही. मार्केट यार्डमध्ये मोठे शेड आहे. खरेदी केलेला कांदा गोण्यांमध्ये भरून ठेवला आहे. मात्र पहाटे झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांच्या दुकाना बाहेर ठेवलेल्या कांद्याच्या गोण्या पावसाने भिजल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कांदा भिजल्याने त्याला वाळविण्याचे आता काम सुरु आहे. तसेच गोण्यात भरलेला कांदा दुसऱ्या गोण्यात भरण्याचे काम कांदा मार्केट मध्ये सुरु आहे. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव पडताना दिसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी चिंतेत असतांना आता दुसरीकडे कांदा व्यापारी वर्गाला देखील लाखो रुपा्यांचा फटका पहाटे झालेल्या पाऊसामुळे बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

Maharashtra Live News Update: शिर्डी पुन्हा हादरली; भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत वाद उफाळणार; चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT