Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Ahilyanagar News : वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश हा चिंताजनक ठरत असून रात्रीच्या वेळी व दिवसा देखील घराच्या बाहेर पडणे कठीण झाले आहे. यामुळे बाहेर न पडण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : मजुरीच्या कामानिमित्ताने आलेला परिवार पत्राचे शेड टाकून वास्तव्यास राहतो. रात्रीच्या सुमारास मुलाला लघुशंकेसाठी बाहेर आणताच तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेले. आईसमोरचं बिबट्याने मुलाला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. यावेळी आईने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरवाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरच्या सिद्धेश्वरवाडी परिसरात सदरची घटना घडली आहे. सिद्धेश्वर वाडी परिसरात बिबट्याने तीन वर्षीय अमन खुंटे या चिमरूड्याला आई समोरचं उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथून मजुरीसाठी आलेले परप्रांतीय खुंटे कुटुंब सिद्धेश्वर वाडी परिसरात पत्र्याच्या शेड टाकून राहत होते. मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवत होते. 

घराच्या बाहेर पडताच बिबट्याचा हल्ला 

दरम्यान सोमवारी रात्री अमन याला लघुशंकेसाठी त्याच्या आईने त्याला घराबाहेर आणले. यावेळी जवळच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अमनवर झेप घेत त्याला आईसमोर जंगलात उचलून नेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अमनची आई भेदरली. तिने आरडाओरडा केला असता परिसरातील लोक जमा झाले. यानंतर घटनेबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. दरम्यान रात्रभर शोध कार्य करून देखील अमन सापडला नाही.  

चिमुकल्याचे केवळ सापडले शीर 

यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पुन्हा सकाळी शोध मोहीम राबविली. यानंतर सिद्धेश्वर वाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला आहे. आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्याचे धड आढळून आले नाही. याबाबत पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. तर बिबट्याला कैद करण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT