Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar News : माजी जिल्हा परिषद सदस्य काकडेंची अपक्ष उमेदवारी; महायुतीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार

Ahilyanagar news : रॅली काढून जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णायक अधिकारी प्रसाद मते यांच्याकडे दाखल केला

Rajesh Sonwane

सुशील थोरात
अहिल्यानगर
: शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी अर्ज भरला. काकडे यांच्या अर्ज भरल्याने महायुतीच्या उमेदवारांचे मात्र टेन्शन वाढणार आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे आणि गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला (Vidhan Sabha Election) अभिवादन करत हर्षदा काकडे यांनी रॅली काढून जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णायक अधिकारी प्रसाद मते यांच्याकडे दाखल केला. हर्षदा काकडे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे (Mahayuti) महायुतीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार असून ही निवडणूक आता मोठ्या चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.  

हर्षदा काकडे या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये काम करत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपपासून अलिप्त झाल्या होत्या. आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीचे उमेदवार मोनिका राजळे यांच्या पुढे एक मोठे आव्हान हर्षदा काकडे यांच्या रूपाने उभा राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT