Jal Jeevan Mission Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission : जलजीवनचा बट्ट्याबोळ; पाणी योजना अपूर्णच, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Ahilyanagar News : राज्यातील अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील जवळपास दहा ते बारा गावांमध्ये मार्च महिन्यातच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : पंतप्रधानांनी जलजीवन मिशन हर घर नल से जल योजना सुरू केली. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात फक्त नळ आहेत, पण जल नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू केलेली ही योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजही काही गावांमध्ये पाण्यासाठी महिलांची वणवण पाहायला मिळत आहे. यामुळे जलजीवन मिशन योजनांचा बट्ट्याबोळ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागात शुद्ध आणि नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी हर घर नल से जल घोषणा देत जल जीवन मिशन अंतर्गत योजना सुरू केली आहे. मात्र सरकारची कितीही इच्छा असली तरी योजना अमलात आणण्यासाठी प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेणार नसेल तर जल जीवन मिशनचे पैसे वाया गेल्याशिवाय राहणार नाही असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे. 

नगर जिल्ह्यातील १० गावात भीषण टंचाई 

राज्यातील अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील सांडवे, दशमी गव्हाण, मदडगाव यासह जवळपास दहा ते बारा गावांमध्ये मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाण्याच्या विहिरी, तलाव अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गेल्या एक महिन्यांपासून अशी परिस्थिती असून लवकरात लवकर पाण्याचे नियोजन करावे किंवा टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. 

योजनेतंर्गत काम तरीही पाणी नाही 

नगर तालुक्यामधील अनेक गावांमध्ये जलजीवन योजने अंतर्गत काम झाले आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नसून अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत असून जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्याचा इशारा संदेश कार्ले यांनी दिला आहे.

योजना ठरतेय फेल 
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल” या उद्देशाने ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र ही योजना फक्त कागदावर असून प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही योजना फेल गेली असल्याचं समोर आले आहे. जल जीवनचे पाणी नळाला कधी येईल याकडेच ग्रामीण भागातील नागरिक वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

Maharashtra Live News Update: ओंकार हत्तीवर फटाके फेकल्याचा व्हिडिओ, वनविभागाकडून खुलासा

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

SCROLL FOR NEXT