Akole News Saam tv
महाराष्ट्र

Akole : राजूर गावात कावीळ आजाराचे थैमान; शंभरहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या राजुर या गावात कावीळची साथ पसरली आहे. काविळीच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

अकोले (अहिल्यानगर) : पाणीटंचाईचे सावट अनेक भागात पसरले आहे. तर काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे. अशात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळ रोगाची साथ पसरली आहे. एकाच गावात आतापर्यंत जवळपास शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या राजुर या गावात कावीळची साथ पसरली आहे. काविळीच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अनेकांना संगमनेर, राजूर आणि अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी 
आदिवासी बहुल अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळीच्या आजाराने थैमान घातले आहे. राजूर आणि परिसरात गेल्या काही दिवसातच १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर विविध शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य पथक राजूर गावात दाखल झाले असून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे.

दूषित पाण्यामुळे साथ पसरल्याचा अंदाज 
दूषित पाण्यामुळे काविळची साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज असून ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण समोर येईल. दरम्यान ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी; असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT