Bhandardara Dam Saam tv
महाराष्ट्र

Bhandardara Dam : भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो; पाण्याचा विसर्ग वाढविल्याने प्रवराला मोठा पूर

Ahilyanagar News : मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे अनेक धारण ओव्हरफ्लो झाली असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

अकोले (अहिल्यानगर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ टीएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण अखेर काठोकाठ भरले आहे. धरणातून ३५५२ क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. तसेच भंडारदरा पाठोपाठ ८ टीएमसी क्षमता असलेले निळवंडे धरण देखील ओव्हरफ्लो झाले असून धरणातून १५०० क्युसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. 

मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आल्याचे चित्र होते. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर आवश्यकता भासल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण फुल्ल
बीड : बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानलेले मांजरा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून बीड, धाराशिव आणि लातूरची तहान भागवणारे मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याची चिंता मिटली असून याच धरणाच्या पाण्याची जलपूजा आज खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. 

गिरणा धरण ७७ टक्के भरले

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालूक्यात असणारे सर्वात मोठे गिरणा धरण सध्या ७७ टक्के भरले असून लवकरच धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. कळवणच्या चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर गिरणा नदी पत्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण भरल्यास त्याचा फायदा मालेगाव, जळगावसह गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या पाणी पुरठा येजनांना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Wednesday : गणेश चतुर्थीला मिळणार ८ राशींना विशेष लाभ; बुधवारचे राशीभविष्य

Mulher Fort : नाशिकला गेल्यावर करा मुल्हेर किल्ल्याची सफर, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: न्यायालय आम्हाला परवानगी देईल ,आम्ही सगळे नियम आणि अटी पाळून आझाद मैदानावर उपोषण करणार- मनोज जरांगे

Pune School: शिक्षणाचा बाजार मांडलाय यांनी...फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो केले व्हायरल | VIDEO

Dharashiv: स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुफान राडा, दगडफेकीत ५ पोलिस जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT