Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Shrirampur : बेकरीत बनविलेला पाव खाताय तर सावधान!; श्रीरामपुरात समोर आला धक्कादायक प्रकार, सुरु होती गोमांस विक्री

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्रीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर देखील अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गोमांस विक्री सुरू

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : रोज सकाळी चहासोबत पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण पाव बनविण्यात येत असलेल्या बेकरीमध्ये चक्क गोमांस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावामध्ये समोर आला आहे. यामुळे मात्र सदरच्या बेकरीतून नियमित पाव खरेदी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्रीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर देखील अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गोमांस विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. असाच धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात समोर आला असून चक्क एका पाव बनवणाऱ्या बेकरीत छुप्या पद्धतीने गोमांस विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

५० किलो गोमांससह एकजण ताब्यात 

या प्रकाराबाबत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने बेकरीत होत असलेल्या गोमांस विक्रीचा पर्दाफाश केला आहे. तर पोलिसांनी बेकरीतून ५० किलो गोमांसासह आरोपी शकील कुरेशी याला ताब्यात घेतले आहे. संबंधित बेकरीतून पाव विकत घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ 

अनेकजण रोज सकाळी चहासोबत पाव खाण्यासाठी खरेदी करत असतात. तर पावभाजी, वडापाव यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पाव खरेदी होत असतो. अर्थात मैद्याने तयार होणारा पाव बेकरीतून तयार केला जात असतो. यामुळे नागरिक हे पाव सहज विकत घेत असतात. मात्र अशा पद्धतीने बेकरीत मांस विक्री करून एक प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT