Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ahilyanagar News : नेवासा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांची जाहीर सभा पार पडली.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

नेवासा (अहिल्यानगर) : राज्यात सरकार कोणाचे बसेल हे अद्याप स्पष्ट होत नसून दावे- प्रतिदावे केले जात आहे. याच दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी नेवासा येथील प्रचार सभेत सरकार किस कि भी हो.. हुकूमत हमारी होती है असे वक्तव्य केले आहे. 

नेवासा (Nevasa) मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची जाहीर सभा पार पडली. दरम्यान नेवासा येथील सभेला यायला उशीर झाल्याने बच्चू कडू यांनी मंचावर चढताच माईक हातात घेतला. अवघ्या तीन मिनिटांत आपले भाषण संपवले. त्यानंतर पुढच्या सभेला जाण्यासाठी मंचावरून उडी मारत बच्चू कडू यांची गाडीत बसण्यासाठी धावपळ दिसून आली.

नेवासात प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्या सोनई गावात पार पडलेल्या या सभेतून बच्चू कडू यांनी गडाखांवर जोरदार प्रहार करत मुरकुटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच बाळासाहेब मुरकुटे फक्त निवडणूक जिंकणार नाही, तर २० हजारांची आघाडी घेणार आहेत. सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है. आमची बॅट तयार असून मागच्या वेळी याच बॅटने गडाखांना जिंकवल. आता हीच बॅट त्यांचा घात करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT