ATM Card Fraud  Saam tv
महाराष्ट्र

ATM Card Fraud : फेविक्विक टाकून एटीएममधून काढायचे रक्कम; ग्राहकांची फसवणूक करणारा एकजण ताब्यात

Ahilyanagar News : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी मुळचा मध्यप्रदेशातील असुन त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मदत करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहिल्यानगर) : एटीएममधून पैसे काढायला जाताय तर सावधान. कारण मदत करण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात अशाच प्रकारे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांना मदत करण्याचा बहाणा करत खात्यातून रक्कम काढत फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. पोलिसांनी तब्बल ६९ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात विविध एटीएममध्ये फ्रॉड करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी दिपक राजेंद्र सोनी हा मुळचा मध्यप्रदेशातील असुन त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मदत करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे तपासात समोर आले आहे. 

असे काढायचे एटीएममधून रक्कम  

एटीएम कार्डच्या स्लॉटमध्ये फेविक्विक टाकून पैसे काढण्याचा प्रकार आरोपीकडून केला जात होता. ग्राहकाने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकल्यानंतर आजुबाजूला असलेले आरोपी पासवर्ड बघायचे. एटीएम स्लॉटमध्ये टाकलेल्या फेविक्विकमुळे एटीएम कार्ड त्यात अडकताच ग्राहक गोंधळून जायचे. अशा वेळी मदतीचा बहाणा करून आरोपी ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्याच कंपनीचे दुसरे एटीएम कार्ड द्यायचे आणि ओरिजनल कार्ड स्वतःकडे ठेवायचे. ग्राहक निघून गेल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड वापरून ग्राहकाच्या खात्यातून पैसे लंपास करायचे. किंवा एखादा ग्राहक कार्ड अडकले म्हणून बँकेत तक्रार करण्यासाठी गेला की आरोपी पासवर्ड टाकून पैसे लंपास करायचे.

कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने सापडला संशयित 
बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याची तक्रार एका ग्राहकाने राहाता पोलिसांमध्ये दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता राहाता शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये एक संशयित दिसून आला. तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित इसमाला बँक परिसरातुन ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकांचे तब्बल ६९ एटीएम कार्ड आढळुन आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT