Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पायावरून गाडी नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण

Ahilyanagar News : जुन्या वादाच्या रागातून नितीन संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत

Rajesh Sonwane

सुशील थोरात 

अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पायावरून गाडी घातली. यात मारहाणीत तरुण जखमी झाला असून दोन वेळा मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास गेले असता पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावात मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाच्या रागातून नितीन संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार या आधीही नितीन यास मारहाण करण्यात आली होती. 

जबरदस्तीने गाडीत बसवून नेत मारहाण 

दरम्यान आरोपींनी नितीन वैरागर यास जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे लाकडी दांड्याने व लाथाबुक्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. यामध्ये नितीन हा गंभीर जखमी झाला असून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नितीन वैरागर याच्यावर सध्या अहिल्यानगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात संभाजी लांडे, संदीप लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे आदींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा फोनवरून साधला संवाद 
तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी ही घटना आहे. या पीडित तरुणाला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर बोललो. यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आमची मागणी आहे. लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबियांच्या सोबत उभी आहे, असा विश्वास पीडित कुटुंबियांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT