Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला

ahilyangar politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसलाय. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

Vishal Gangurde

निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर

भाजपमध्ये नेत्यांचा पक्षप्रवेशाचा धडाका

नगरमधील काँग्रेस नेत्याचाही भाजपमध्ये प्रवेश

सचिन बनसोडे, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. ऐन निवडणुकीत भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. नगरमध्येही भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या कोपरगाव शहराध्यक्षांनी पक्षाची साथ सोडली आहे. ते काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसला धक्का बसलाय. कोपरगाव शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पोटे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभेतच पोटे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षाचा राजीनामा काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पोटे यांचा भाजप पक्षप्रवेश हा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनाही धक्का मानला जात आहे.

अजित पवारांना मोठा दिलासा

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने विरोधकांची आक्षेप याचिका फेटाळली. त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवकपदाच्या 29 उमेदवारांवर आक्षेप नोंदवला होता. प्रतिज्ञापत्राच्या शेवटच्या पानावर सही नसल्याचा आक्षेप घेत भाजपने कोर्टात धाव घेतली होती.

कोर्टाने आक्षेप याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजप उच्च न्यायालयात जाणार का? याकडे लक्ष लागलं आहे. मात्र कोपरगाव न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोपरगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काळे आणि भाजपचे कोल्हे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT