MLA Sangram Jagtap Receives Death Threat : अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांना बुधवारी रात्री जीवे मारण्याची धमकी मिळाली. खासगी स्वीय सहाय्यक यांच्या मोबाइलवर धमकीचा मेसेज आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जगताप यांच्याकडून तात्काळ पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. (Who sent the death threat to NCP MLA Sangram Jagtap?)
अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली अन् एकच खळबळ उडाली. आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर धमकीचा टेक्स्ट मेसेज आला होता. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार संग्राम जगताप चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केला आहे. पोलिसांकडून सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. या प्रकऱणाचा तपास कोतवाली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत. आमदार जगताप सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबई येथे आहेत. (Ajit Pawar faction MLA receives life threat ahead of monsoon session)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.