कॉलेजमध्ये झेंडा वंदन करून परतणाऱ्या तरुणांचा अपघात
भरधाव मालट्रकने दुचाकीला दिली जोरदार धडक
एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
अहिल्यानगर शहरात दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कॉलेजमध्ये झेंडा वंदन करून घरी परतणाऱ्या दोन कॉलेज तरुणांच्या दुचाकीला भरधाव मालट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. दरम्यान, शहरातील दुसऱ्या ठिकाणी झालेल्या दुसऱ्या अपघातात आणखी दोन तरुण किरकोळ जखमी झाले.
पहिला अपघात शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर झाला होता यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. शहरातील दुसरा अपघात बस स्थानकासमोर झाला. या अपघातात आणखी दोन तरुण किरकोळ जखमी झाले. गौटुंबा आखाडा (ता. राहुरी) येथील संकेत सखाराम बाचकर (वय १८) व श्रीकांत हापसे हे दोघे २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास राहुरी कॉलेज येथे झेंडा वंदन करून दुचाकीवरून घरी परतत होते.
(टी.एन. २९ बी झेड ३३८१) क्रमांकाच्या मालट्रकने गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर संकेत बाचकर आणि श्रीकांत हापसे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेमुळे संकेत रस्त्यावर फेकला गेला जात रस्त्यावर पडला, त्यानंतर मालट्रक त्यांच्या अंगावरून गेला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला.
श्रीकांत हापसे गंभीर जखमी असून त्याच्यावर राहुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकेतच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. वडील सखाराम बाचकर हे स्कूल बस चालक म्हणून काम करतात.
शहरातील दुसरा अपघात राहुरी बस स्थानकासमोर घडला. कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय १८) आणि सार्थक कैलास आहेर (वय १९) हे दोघे दुचाकीवरून कानडगावहून डोंगरगणकडे जात होते. त्यावेळी आयशर टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. या अपघातात प्रसाद गागरे गंभीर जखमी झाला तर सार्थक आहेर किरकोळ जखमी झाला आहे. एकाच दिवशी नगर–मनमाड राज्य महामार्गावर दोन ठिकाणी घडलेले अपघात झाल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभार उघड झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.