Ahilyanagar News  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

Ahilyanagar Mula River News : अहिल्यानगरमध्ये घारगावजवळ मुळानदीच्या पुलाखाली ४-५ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला. हा प्रकार जादूटोण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुलाखाली ४-५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह

  • मृत्यूमागे जादूटोण्याचा संशय, गावात भीतीचं वातावरण

  • पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला

  • मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही

अहिल्यानगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव जवळील मुळानदीच्या पुलाखाली चार ते पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगाव नजीक आज सकाळी मुळानदीकडे गेलेल्या काही गावकऱ्यांना पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. चिमुकल्याचा मृतदेह बघून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून घटनेचा पंचनामा केला आहे. असं असलं तरी या चिमुकल्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मात्र प्राथमिक तपासात जादू टोणा असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. हा चिमुकला नेमका कोण? त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आणि मृतदेह पुलाखाली कसा आला? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

पोलीस या या मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेत असून त्याचा मृत्यू कसा झाला याचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान कुणाला याबाबत काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन घारगाव पोलिसांनी नागरिकांना केले आहे. मुलाचा मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : न्यू ईअर पार्टीसाठी स्कीन ग्लोइंग हवीये? मग हे टॉप फाईव्ह फेसपॅक नक्कीच ट्राय करा

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

रेल्वेच्या डब्यावर X चिन्ह का असतं?

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

SCROLL FOR NEXT