Aher Government Officer Attacked saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli news : नगरपंचायत अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; जिल्हा परिषद माजी अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

aheri nagar panchayat officer attacked crime news: अतिक्रमणविरोधी कारवाईच्या रागातून नगरपंचायतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना गडचिरोलीतील अहेरमध्ये घडलीय. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांसह चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Nandkumar Joshi

  • अहेरीत नगरपंचायत अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

  • माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह चौघांवर गुन्हा

  • अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याचा राग

गणेश शिंगाडे, गडचिरोली | साम टीव्ही

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे नगरपंचायतीचे कर आणि प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह चौघांच्या विरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पांढरे हे आज, बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. आबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा मार्गावर संशयित आरोपींनी त्यांचा रस्ता अडवला. त्यांना लाकडी फळीने मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अतिक्रमणविरोधी कारवाईच्या रागातून हल्ला

नगरपंचायतच्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या रागातून अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अजय कंकडालवार, पिंटू मडावी, अजय नैताम आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

वाशिम नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून हल्ल्याचा निषेध

अधिकाऱ्यावरील जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेचा वाशिमच्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदेचे करनिर्धारक प्रशासकीय सेवा अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर मॉर्निंग वॉकला गेले असता जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा करत आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

SCROLL FOR NEXT