Karjat local election updates 2025 ; स्थानिक स्वराज्य संस्थांचे राज्यात बिगुल वाजलेय. प्रत्येक पक्षाकडून उमेदवाराची जुळवाजुळव सुरू आहे. निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. रायगडमधील कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना खिळखिळी झाली आहे.
कर्जत मतदारसंघातील अजित पवार गटाने शिंदेंच्या शिवसेनेला आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे. माजी नगरसेवक किशोर पानसरे , राम राणे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी हर्षल मोरे यांच्यासह युवा सेनेतील अनेक पदाधिकार्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुतारवाडी मध्ये पार पडला. त्यामुळे कर्जत मतदारसंघात अजित पवार गटाची राजकीय ताकद वाढलेले आहे. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दृष्टीने अजित पवार गटांनी जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात महायुतीचं सूत जुळताना दिसत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून ठेवलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला सुनील तटकरे यांनी झिडकारला असतानाच आता भरत गोगावले यांनी नगर पालिका निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव ठेवलाय. ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्याला जास्त जागा द्यायच्या, ताकद पाहून जागा वाटपाचा हा प्रस्ताव आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.