Vikhe Patil 
महाराष्ट्र

तर मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा; विखे पाटलांचा हल्लाबोल

तर मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा; विखे पाटलांचा हल्लाबोल

गोविंद साळुंखे

अहमदनगर : स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना दोष देण्याचे काम महाविकास आघाडीचे मंत्री करताहेत. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमध्ये थोडीही चाड शिल्लक असेल; तर त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत माजी मंत्री तथा भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता हल्लाबोल केला. (ahamadnagar-news-Chief-Minister-should-resign-Nawab-Malik-Vikhe-Patil's-attack)

देशात १०० कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल लोणी (ता.राहाता) येथे विखे- पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कॅबिनेट मंत्री सरकारी अधिकाऱ्याला धमक्या देतात. हे कधी ऐकले नाही. तुमच्याकडे वेगळी आयुधं आहेत ना. उच्च न्यायालयात जा.. तक्रार करा. मात्र, धमकीच्या अशा प्रकारामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला. मंत्री धमक्या देत असताना त्यांचे नेते काय करतात. त्यांच्या पक्षातल्या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींचा नायनाट करणार का? असा सवालही आमदार विखे-पाटलांनी शरद पवारांचे नाव न घेता केला.

आघाडी सरकारवर टीका

एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करण्याचा हा डाव आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ असून लवकरच सत्य बाहेर येईल. त्यावेळी यांना पळता भुई थोडी होईल, अशी टिकाही विखे-पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT