Maharashtra Farmers News Saamtv
महाराष्ट्र

Orange Export: बांग्लादेशचा एक निर्णय अन् विदर्भातले संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत, अडीच लाख टन संत्रा पडून राहणार?

Maharashtra Farmers News: केंद्र सरकारने भारतातील बांग्लादेशमध्ये निर्यात होणारा कांदा थांबवल्यामुळे आता बांग्लादेशनेही शेतकऱ्यांची कोंडी केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी

Maharashtra Farmers News:

काही दिवसाआधी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. ज्याचा मोठा फटका बांग्लादेशला बसला. बांगलादेश सर्वाधिक कांदा हा भारतातील आयात करत होता. मात्र केंद्र सरकारने भारतातील बांगलादेशमधून निर्यात होणारा कांदा थांबवल्यामुळे बांगलादेशाने सुद्धा आता संत्र्यावर आयात शुल्क वाढवून मोठी कोंडी केली आहे.

विदर्भात किमान 2 लाख 50 हजार हेक्टरवर संत्र्याचे क्षेत्र आहे. दरवर्षी 12 ते 15 लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन विदर्भात घेतल जाते. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते तर यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून देशात व बांगलादेश मध्ये सुद्धा संत्राला भाव नाही त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

दर्जेदार संत्रा हा विदर्भातील अमरावती (Amravti) व नागपूरचाच (Nagpur) आहे अशी जगभरात ओळख आहे. भारतातील 40 टक्के संत्रा हा बांगलादेशमध्ये निर्यात केला जातो. मात्र बांगलादेश सरकारने संत्र्यावर प्रतिकिलो 88 रुपये आयात शुल्क लावल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

वाहतूक खर्चामुळे संत्र्याची बांग्लादेशमधील निर्यात अर्ध्यावर आली आहे, तर दुसरीकडे देशांअंतर्गत बाजारात संत्र्याची मागणी कायम असल्याने संत्रीची दर 60 ते 70 हजार रुपयांवरून 20 ते 25 हजार कोटी प्रती टनावर आले आहे. त्यामुळे तोडणी होऊन बाजारात आलेला संत्राला इथेही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT