Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्येत मोठी वाढ; 10 महिन्यातील आकडेवारी धडकी भरवणारी

Samriddhi Highway Accident: 10 महिन्यात समृद्धी महामार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आहे.
Samruddhi Highway Accident Statistics Last 10 Months 123 Died Many Injured
Samruddhi Highway Accident Statistics Last 10 Months 123 Died Many InjuredSaam tv
Published On

Samriddhi Highway Accident Statistics

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील लोकार्पण होऊन जवळपास 10 महिन्यांचा कालावधील लोटला. तर दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण होऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत.  (Latest Marathi News)

या 10 महिन्यात समृद्धी महामार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून यामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 महिन्यात समृद्धी महामार्गावर एकूण 1 हजार 281 अपघात झाले आहेत. यामध्ये तब्बल 123 प्रवाशांचा जीव गेला आहे. जखमींची संख्या हजाराच्या घरात आहे.

Samruddhi Highway Accident Statistics Last 10 Months 123 Died Many Injured
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार; भर रस्त्यात ट्रक थांबवल्याचा VIDEO समोर

यामध्ये विदर्भ ट्रॅव्हल्स बस अपघात, पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेली दुर्घटना. तसेच छत्रपती संभाजीनगरजवळ झालेल्या 12 प्रवाशांचा मृत्यू, यासारख्या घटनांचा समावेश आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघातांचं प्रमाण लक्षात घेता, परिवहन विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली होती.

आरटीओकडून वाहनांची वेगमर्यादा ताशी 150 वरुन 120 पर्यंत आणली गेली. मात्र, तरी देखील अपघातांचं प्रमाण काही थांबलं नाही. समृद्धी महामार्गावर टायर फुटून अपघात होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यासाठी परिवहन विभागाने वाहनचालकांना गाडीत नायट्रोजन हवा भरण्याचे आवाहन केले.

यासाठी ठिकठिकाणी हवा भरण्याची तसेच वाहनांची तपासणी करण्याचे सेंटर देखील उभारण्यात आले. इतकंच नाही तर, समृद्धी महामार्गावर जुन्या वाहनांना प्रवेश देखील नाकारण्यात आला. तसेच महामार्गावरून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसची तसेच इतर वाहनांची फिटनेस चाचणी देखील करण्यात आली.

मात्र, तरी देखील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, समृद्धीवरील होणाऱ्या अपघातांसंबधीचे आरोप महामार्गाशी निगडित यंत्रणेवर आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करता बेलगाममध्ये वाहन चालविल्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप केला जात आहे.

तसेच महामार्गावरील अपघात स्पॉट तपासण्यास यंत्रणा कमी पडत असल्याचाही आरोप होतोय. त्यामुळे एमएसआरडीसीची यंत्रणा हताश झाली आहे. आता महामार्गावरील हे अपघातांचं प्रमाण थांबण्यासाठी सरकार आणखी काय उपाययोजना राबवणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Samruddhi Highway Accident Statistics Last 10 Months 123 Died Many Injured
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार; भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळणार? सुनील तटकरे म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com